अखेर मुहूर्त मिळाला! आजच होणार खातेवाटप, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ मात्र कायम

शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील (Shinde-Fadanvis-Pawar Government) खातेवाटपला अखेर मुहूर्त मिळालाय. शपथविधी घेऊन 11 दिवस उलटल्यानंतर अखेर आज राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांचं खातेवाटप होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेना (Shivsena) आणि भाजपच्या (BJP) काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. खातेवाटपाची चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांशी  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बैठक घेणार आहेत. काल रात्री अजित पवार, प्रफुल पटेल यांची गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाल्यानंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय. त्यामुळे आता कुणाला कोणते खातं मिळणार याचीच उत्सुकता लागलीय.

अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी काल रात्री दिल्लीत अमित शाहांची भेट घेत प्रदीर्घ चर्चा केली. य बैठकीत राष्ट्रवादीला हवी असलेली खाती आणि राष्ट्रवादीला देता येतील अशी खाती यावर चर्चा झाली असं सांगितलं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य न्यायालयीन लढ्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच विधानपरिषदेतल्या 12 जागांमध्येही राष्ट्रवादी अजित पवार गटाने वाटा मागितला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. जित पवारांच्या दिल्ली दौ-यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यामुळे खातेवाटपाचा तिढा आज सुटणार असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *