चहावाल्याचाही दुष्काळग्रस्तांना हातभार, नानांच्या हाती दोन हजारांची मदत सुपूर्द

चहावाल्याचाही दुष्काळग्रस्तांना हातभार, नानांच्या हाती दोन हजारांची मदत सुपूर्द

नाना पाटेकर संस्थेची नोंदणी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात पोहचले आणि एकच गडबड उडाली. प्रत्येकाला नानासोबत सेल्फी काढायचा होता. परंतु नाना पाटेकर कशासाठी या कार्यालयात आले आहेत, कोणत्या उद्देशासाठी इथे आले आहेत हे समजताच मदतीचा ओघ सुरु झाला.

धर्मादाय सहआयुक्त कार्यालयातच अनेकांनी नानाकडे पैसे सोपवले. फक्त अधिकारीच नव्हे तर कार्यालयात येणाऱ्या चहावाल्यानेही दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. चहावाल्यानेही लागलीच दोन हजार रुपयांची मदत नाना पाटेकरांकडे सुपूर्द केली.

जनतेकडून येणारी मदत स्वीकारण्यासाठी आणि त्याचा योग्यप्रकारे विनियोग करण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी ‘नाम फांऊण्डेशन’ या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेला एस.बी.आय. बँकेचा एक अकाऊंट नंबरही देण्यात आला.

करंट अकाऊण्ट नंबर

35226127148

IFC Code No.

SBIN 0006319

Swift Code No.

SBININBB238

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *