विद्याविहार येथे दुमजली बंगला खचला, दोनजण अडकले

 विद्याविहार पूर्वेला असलेल्या चित्तरंजन कॉलनीत एक दुमजली बंगला आठ ते दहा फूट खचल्याची घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. बंगल्यात दोनजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

 विद्याविहार येथील राजावाडी रुग्णालय परिसरात हा दुमजली बंगला असून सकाळी नऊच्या सुमारास अचानक बंगल्याचा तळमजला सात ते आठ फूट खाली खचला. या बंगल्यात दोन कुटुंबे राहात होती. बांगला खचताच काही जणांनी बाहेर धाव घेतली. तर चारजण बंगल्यातच अडकले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस आणि पालिका अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अडकलेल्या दोघांना बाहेर काढले आहे. मात्र अद्यापही नरेश पालांडे आणि त्यांची आई आतच अडकली आहे. गेल्या चार तासापासून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न अग्निशामक दल आणि एनडीआरएफकडून सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *