शाळेच्या शिक्षकानेच विद्यार्थिनी पळवून नेलं; जालना येथील धक्कादायक प्रकार

शिक्षक हे समाज घडवण्याचे काम करत असतात. गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य एका शिक्षकाने केले आहे. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकानेच विद्यार्थिनी पळवून नेलं आहे. जालना येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  संतप्त ग्रामस्थांनी संस्थाचालकाला जाब विचारत शाळेला ठोकलं कुलूप. तसेच जो पर्यंत विद्यार्थीनी पालकांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत शाळा सुरु होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा देखील ग्रामस्थांनी घेतला आहे.

जालना जिल्ह्यातल्या ढासला गावात हा प्रकार घडला आहे. बदनापूर तालुक्यातील ढासला गावात सोनामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये हा शिक्षक कार्यरत आहे.  महेंद्र साठे असे या शिक्षकाचे नाव आहे. साठे या शिक्षकाने इयत्ता बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याचा आरप केला जात आहे. याची माहिती मिळताच नातेवाईक आणि नागरिकांनी शाळा गाठत मुख्याध्यापक आणि संस्थाचालकाचा याचा जाब विचारला. त्याचबरोबर शाळेला कुलूप ठोकत आरोपी शिक्षकाला अटक होत नाही तसेच मुलीला जोपर्यंत पालकांच्या ताब्यात परत देत नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नसल्याची भूमिका घेतली. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात तणावाचे वातावर निर्माण झालेय. नागरिकांनी शाळेतच ठिय्या मांडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *