औरंगाबाद परिसरात कृत्रिम पावसाचे प्रयोग झाल्यानंतर आता 15 सप्टेंबरपासून पुणे परिसरांत कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जाणार आहेत. कृत्रिम पावसासाठी वापरले जाणारे विमान उद्या पुण्यात दाखल होत आहे.
पुढील 10 दिवस पुणे परिसरांत जुन्नर, मावळ ,खेड या भागांतील धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. सध्या या भागांत ढगांची स्थिति अनुकूल आहे. त्यामुळे प्रयोग केल्यास यश मिळण्याची शक्यता आहे.
सध्याची या भागातील पाणी टंचाई लक्षात घेता आणि ढगांची अनुकूल परिस्थिति लक्षात घेता हा प्रयोग केला जाणार आहे.

