‘माथेरानची राणी’ म्हणून प्रसिद्ध असलेली ‘मिनी टॉय ट्रेन’ पर्यटकांचे खास आकर्षण आहे. मात्र पावसाळ्यात नेरळ आणि अमन लॉजदरम्यानची प्रवासी सेवा खंडित करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. १० जून ते १५ ऑक्टोबरपर्यंत ही सेवा बंद ठेवण्यात येईल. या दरम्यान माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू राहतील.
मुंबईकरांना जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान ओळखले जाते. पावसाळ्यात येथील निसर्गदृश्य पाहण्यास पर्यटकांची मोठया संख्येने गर्दी जमते. नेरळ ते माथेरान धावणारी ‘मिनी टॉय ट्रेन’ पर्यटकांचे विशेष आकर्षण केंद्र आहे. मात्र मध्य रेल्वेने नेरळ ते अमन लॉज दरम्यानची प्रवासी सेवा १० जून ते १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
