लालबागमध्ये अपघातात चिमुकलीचा मृत्यू

लालबाग उड्डाणपुलावर टॅक्सीच्या पुढे जात असताना झालेल्या दुचाकीच्या अपघातात ३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. ती मुलगी आई-वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रियांशी उमेश टाक (३) असे मृत मुलीचे नाव असून याप्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहे.

रियांशीही आई-वडिलांसोबत धारावी परिसरात राहण्यास होती. रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास ती वडील उमेश आणि आई वैशाली यांच्यासोबत जात असताना दुचाकींचा लालबाग उड्डाणपुलावर अपघात झाला. त्यांना तात्काळ जवळच्या मसीना रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले आहे. या घटनेने कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. टॅक्सीच्या पुढे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *