मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, यापुढे Bandra Versova sea link चे नवे नाव…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा करत मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे नाव बदलले आहे. यापुढे वांद्रे-वर्सोवा सी लिंक वीर सावरकर सेतू म्हणून ओळखला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याची चर्चा सुरु होती. तसेच राज्य सरकार वांद्रे-वर्सोवा लिंकचे नाव बदलणार असल्याचे म्हटलं जात होते. अशातच आता वीर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीनिमित्तच वांद्रे-वर्सोवा सी लिंकला नवीन नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, यापुढे वांद्रे-वर्सोवा सी लिंक वीर सावरकर सेतू म्हणून ओळखला जाईल. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना वीर सावरकर शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. त्यामुळे आता वांद्रे वरळी सी लिंक आता वीर सावरकर सेतू म्हणून ओळखला जाणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, तर वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल)ला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *