पैशासाठी पत्नीची विक्री; मित्रांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले

 पैशासाठी पतीनेच पत्नीला वेश्याव्यवसाय करयासाठी भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मित्रांकडून पैसे घेत त्यांच्यासोबत संबंध ठेवण्यास पत्नीला भाग पडले. याप्रकरणी पतीसह त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका विवाहित महिलेने तक्रार दिली आहे.

पीडित महिलेच्या पतीने पैशाची गरज भागवण्यासाठी फिर्यादी यांना मारहाण करून उंड्री हांडेवाडी रस्त्यावर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. इतकेच नाही तर दोन मित्रांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेऊन पत्नीला त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर पतीच्या मित्रांनी तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. फिर्यादी महिला रास्ता पेठ भागातून जात होती. पतीच्या मित्रांनी तिला रस्त्यात अडवले. जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *