कांदीवली पूर्व येथील समता नगर पोलीस ठाण्यात मद्यप्राशन केलेल्या तरूणीने धिंगाणा घातला. यावेळी तरूणीने पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. अखेर याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तरूणीला अटक करण्यात आली आहे. आरोपी तरूणी दारू पिऊन दंगा करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.
त्यावेळी पोलिसांनी तिला रिक्षात बसून घरी जाण्यास सांगितले. परंतु तिने घरी न जाता पोलीस ठाण्यात येऊन शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तेथील महिला पोलिसांनी तिला महिला अंमलदार कक्षात येण्यास सांगितले. त्यावेळी तिने महिला पोलिसांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यावेळी महिला पोलिसाचा कुर्ताही तरुणीने फाडला. अखेर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व महिला पोलिसाचा विनयभंग केल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तरूणीला अटक करण्यात आली असून निशिगंधा बागवे (२६) अशी या तरूणीची ओळख पटली आहे. ती पुण्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
