ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हल्ला, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

ठाण्यात सरकार पुरस्कृत हल्ला घडवून आणला आहे. ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेली मारहाण ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या आदेशानेच झालीय, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ठाण्यात गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे राज्य आहे की नाही, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

आम्हालाही हल्ला करता येतो. ठाण्याच्या पोलिसांनी हातात बांगड्या भरल्या आहेत का? एका महिलेवर हल्ला केला जात आहे. हल्ल्या करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. राज्यात कायदा आहे का की नाही? हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन होत आहे. तुम्ही पोलिसांना बाजुला ठेवा, मग बघा?, असा इशारा देताना राऊत म्हणाले, आम्हालाही हल्ला करता येतो. त्यावेळी समजेल हल्ला काय असतो तो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *