निर्दयीपणाचा कळस! वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करताना दिसतं आहे. हे कृत्य पाहून  निर्दयीपणाचा कळसच आहे असंच म्हणायला हवं. ज्येष्ठ नागरिकांना केअर सेंटरमध्ये त्यांचा देखभालसाठी ठेवण्यात येतं. त्यांचा सोबत अशी वागणून पाहून नेटकरी संतापले आहेत. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

धक्कादायक व्हिडीओ 

केअर सेंटर  या वृद्धाश्रमात एका 86 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्यात आलीय. वृद्धाश्रमात काम करणाऱ्या केअर टेकरनं ही मारहाण केलंय. मारहाणीची घटना एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रित केलीय.

कुठे घडली ही घटना?

हा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील ऐरोली  साई केअर सेंटर या वृद्धाश्रमात घडली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर  काही समाजसेवकांच्या तक्रारीवरून रबाळे पोलीस ठाण्यात केयर टेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *