मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, वीज दरवाढीचा मोठा शॉक

महागाईच्या वणव्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक  बसण्याची शक्यता आहे. 1 एप्रिलपासून मुंबईकरांना जादा बिल भरावे लागू शकते. अदानी, टाटा आणि बेस्ट या तीन्ही वीज कंपन्यांनी दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर सुनावणी पूर्ण झाली आहे. 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येतील, त्यानंतर मग प्रस्तावीत वीज दरवाढ लागू होईल. तेव्हा मुंबईकरांचे महिन्याचं बजेट मात्र कोलमडणार आहे. अदानींकडून 2 ते 7 टक्के, तर टाटाकडून 10 ते 30 टक्के दरवाढ प्रस्तावित आहे.

वीज दरवाढीचा प्रस्ताव, आता अमलबजावणी बाकी

बेस्टची वीज 18 टक्क्यांनी महागण्याची चिन्हे आहेत.  महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे  बेस्टने वीज दरवाढीचा तसा प्रस्ताव सादर केला आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 साठी ही वीज दरवाढ असेल. घरगुती ग्राहकांमध्ये 100 युनिट वापरकर्ता ग्राहकांसाठी बेस्टने 18 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव आयोगापुढे दाखल केला आहे. जास्त वीज वापरत असलेले घरगुती ग्राहक टाटा पॉवरकडे वळू नयेत यासाठी बेस्टचा प्रयत्न आहे. 301 ते 500 युनिट वापरकर्त्यांसाठी फक्त दोन टक्केच दरवाढीचा प्रस्ताव आहे. दुसरीकडे वाणिज्य आस्थापनात, दुकाने, व्यावसायिक गाळ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण या ग्राहकांच्या  वीजदरात 6 टक्के कपातीचा प्रस्ताव बेस्टने सादर केला आहे.

महावितरण पाठोपाठ अदानी आणि टाटा वीज महागणार

मुंबईतील कॉमन मॅनचे महिन्यांचं  बजेट कोलमडणार आहे. मुंबईकरांना वीजबिलासाठीआता जास्त पैसे मोजावे लागणार आहे.  सध्याचा सरासरी वीज पुरवठ्याचा दर (कॉस्ट ऑफ सप्लाय) 7.27 रुपये प्रति युनिट आहे. हे दर अजून वाढविण्यासाठी महावितरण पाठोपाठ अदानी आणि टाटा यांनीही वीज दरवाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्याचवेळी आदा बेस्टनेही तसा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर वीज दरवाढीचा बोजा वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *