सार्वजनिक उद्यानात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

पाचपाखाडी येथील महापालिकेच्या शहीद उद्यानात नागेंदर यादव (२८) यांनी झाडाला मफलरच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला आहे. नागेंदर याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणाची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पाचपाखाडी येथील पाटीलवाडी भागात ठाणे महापालिकेचे शहीद उद्यान आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास एका व्यक्तीचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह येथील सुरक्षा रक्षकाला आढळला. सुरक्षा रक्षकाने तात्काळ याची माहिती नौपाडा पोलीस आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास दिली. पथकाने मृतदेह खाली उतरविला. नागेंदर यादव असे मृताचे नाव असून तो परिसरातच राहत असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *