अत्याधुनिक शिक्षण देणारी झेडपीची फाईव्ह स्टार शाळा…

अत्याधुनिक शिक्षण देणारी झेडपीची फाईव्ह स्टार शाळा…

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात तब्बल दीड कोटीची जिल्हा परिषदेची शाळा उभी राहिली आहे. केंजळ गावातील या शाळेला मागील वर्षी दशकपूर्ती झाल्यानं जिल्हा परिषदेचे सभापती आणि माजी विद्यार्थी चंद्रकांत बाठेंनी शाळेचं स्वरुप पालटायचं ठरवलं. यामुळे बघताबघता आधुनिक विषयाचं शिक्षण देणारी शाळा इथं उभी राहिली.

इंग्रजीपासून इतिहासाचे धडे इथं अत्याधुनिक पद्धतीनं शिकवले जातात. विशेष म्हणजे मुलांमध्ये भाज्यांची आवड निर्माण होण्यासाठीही इथं भाज्या पिकावणे आणि त्या खाणं असा प्रयोगही राबवला जातो. झेडपीच्या या खास शाळेचे फोटो सध्या सोशल मीडियामधून व्हायरल होत आहेत.

भोर तालुक्यातली केंजळ गावातील जिल्हा परिषदेची शाळा. 1914 मध्ये या शाळेची स्थापना झाली. 2014ला म्हणजे मागच्या वर्षी या शाळेची दशकपूर्ती झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि याच शाळेचे माजी विद्यार्थी चंद्रकांत बाठे यांनी शाळेचं स्वरूप पालटायचं ठरवलं आणि याला साथ मिळाली शिक्षणाची तळमळ असणाऱ्या शिक्षकांची.

रोज 40 किलोमीटर लांबून येऊन मुलांना शिकवणारे मुख्यध्यापक पाटील सर असोत वा इतर शिक्षक. इतर शाळांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची त्यांची तळमळ होती. शाळेनं खूप वेगळा प्रयोग राबवला आहे. शहरातल्या खासगी शाळांमध्ये भरमसाठ फी घेऊन केले जाणारे प्रयोग इथे एक रूपयाही न घेता होतात.

गावाकडल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली पोरं आता व्यवस्थित इंग्रजी बोलतात. म्हणजे इंग्रजी शिकण्याची पद्धतच मास्तरांनी बदलली असल्यामुळे आता इंग्रजी भाषेची भीती त्यांना वाटेनाशी झाली आहे. घोकमपट्टीपेक्षा ती कृती करून बघा. आयुष्यभर लक्षात राहिल हा तिथला मंत्र. त्यामुळे नदीवर पाणी आणायला जातानाही पोरं मस्त इंग्रजी बोलतात.

या शाळेत सगळ्यात वेगळी आणि आकर्षित करणारी गोष्ट आहे इथलं उर्जा पार्क आणि हे उर्जा पार्क पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येतात. ऊर्जा पार्कचं मॉडेल जर मोठ्या स्केल मध्ये राबवलं तर कदातिच ऊर्जानिर्मितासाठी हा एक महत्वाचा पर्याय होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *