कणकवलीत खासगी बस पलटी होऊन मोठा अपघात; दोन जण ठार, सहा जखमी

मुंबई गोवा महामार्गावर कणकवली शहराजवळील हळवल फाट्यावर गोवा येथील खासगी बस पलटी होऊन दोघांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.जखमींना अधिक उपचारांसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शैलजा प्रेमानंद माजी (५६ दोडामार्ग) व अण्णा गोविंद नाले (५२ सातारा) अशी मृतांची नावे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

कोकणात दोन अपघात!

एकीकडे मुंबई-गोवा महामार्गावर हा अपघात घडला असताना दुसरीकडे माणगाव परिसरात भीषण अपघात झाला. ट्रक आणि इको कारची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. पहाटे पाचच्या सुमारास ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो विरुद्ध दिशेला जावून समोरून येणाऱ्या इको कारला धडकला. हा अपघात एवढा भीषण होता की, ९ जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये ४ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहेत.या अपघातात ४ वर्षाचं लहान मूल बचावलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *