राहुड घाटात धावत्या एसटी बसने घेतला पेट, चालकाच्या सतर्कतेमुळे ३५ प्रवाश्यांचे वाचले प्राण

शहादा ते मुंबई जाणाऱ्या एसटी बसला चांदवड तालुक्यातील राहुड घाटात आग लागली. या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण करीत बसला कवेत घेतले, यावेळी बस चालकाने सतर्कता दाखवत बस महामार्गाच्या कडेला उभी करत, बस मधील ३५ प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले.

यावेळी मंगरूळ टोल नाक्यावरील अग्निशमन दलाच्या गाडीने त्वरित घटनास्थळी पोहचुन आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *