रस्ता सुरक्षा कार्यशाळा जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे येथे पार पाडली

रस्ता सुरक्षा कार्यशाळा जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे येथे पार पाडली

दरवर्षीप्रमाणे रस्ता सुरक्षा सप्ताह राज्यावर पाळला जातो यावर्षी देखील हा सप्ताह पाळण्यास सुरुवात झाली. जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे आणि सुरक्षा अभियान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा कार्यशाळा दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे पार पाडली.

ही कार्यशाळा सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत आयोजित करण्यात आली होती. रस्ता सुरक्षा कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे इंजिनियर विलास कांबळे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे, आयोजक डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. विलास  पवार,  सुरक्षा अभियान ट्रस्ट संस्थापक/अध्यक्ष व रस्ता सुरक्षा संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.विलास साळवे यांनी केले व अध्यक्ष डॉ. विलास पवार यांनी सुरक्षा अभियान कामकाजाबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवर यांची भाषणे झाली. प्रमुख पाहुणे इंजिनियर विलास कांबळे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे, यांनी आपल्या भाषणात आम्ही रस्ता सुरक्षा विषयी काळजी घेतो तसेच रस्ता सुरक्षा आमची प्रायोरिटी आहे व आम्ही त्यात आमचे कौशल्य पणाला लावतो असे म्हणाले. सुरक्षा अभियान ट्रस्टला सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमात डॉ.विलास साळवे, डॉ. जावळे, डॉक्टर, नर्सेस व इस्पितळ स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 रस्ता सुरक्षा विषयी विविध चित्रफिती कार्यशाळेत दाखवण्यात आल्या. अ‍ॅड. विराट विलास पवार यांनी कार्यशाळेतील उपस्थित प्रतिक्रिया जाणून घेतल्या. रस्ता सुरक्षा विषयावर कार्यशाळेत भाग घेतलेल्यांनी फार चांगल्या प्रकारे मार्गदर्शन अ‍ॅड. विराट विलास पवार यांनी केले.

दुपारच्या सत्रामध्ये एक्सपर्ट ड्रायव्हिंग स्कूलचे अधिकारी अमोल बुरुड यांनी ड्रायव्हिंग बद्दलचे नियम सांगितले व गाडीची रचना, लाइट्स याबद्दल माहिती दिली.  श्री. जोशी, इस्पितळ अधिकारी यांनी ही कार्यशाळा पूर्णत्वात नेण्यासाठी प्रयत्न केले.

उपस्थित सर्वांनी कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल सुरक्षा अभियानचे आभार मानले व चळवळी सामावून घेण्याची विनंती केली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.विलास पवार यांनी आपण वर्षभर रस्ता सुरक्षा विषय कार्यक्रम राबवण्यात व त्याविषयी जनजागृती करण्यासाठी सातत्याने असे कार्यक्रम करत राहणार आहोत व आपण सुद्धा या सहभागी व्हावे असे उपस्थित त्यांना आवाहन केले व कार्यशाळेची सांगता झाली असे जाहीर केले.

20230117_12210520230117_12563520230117_152614

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *