चारा समजून गायीने बॉम्ब तोंडात पकडला

चारा समजून गायीने बॉम्ब तोंडात पकडला

चारा समजून तोंडात बॉम्ब पकडल्याने झालेल्या स्फोटामध्ये एका गायीचा मृत्यू झाला. तामिळनाडूच्या राजापलायम जिल्ह्यातील काथाडिचान ओरानी गावामध्ये ही दुर्देवी घटना घडली.

काथाडिचान गावातील मोकळया माळरानावर मंगळवारी गायींच्या कळपाला चरण्यासाठी सोडण्यात आले होते. या कळपामध्ये पाचशेपेक्षा जास्त गायी होत्या.

यातील एका गायीने चरता चरता चारा समजून गावठी बॉम्ब तोंडात पकडला. या बॉम्बचा स्फोट होऊन गायीचा मृत्यू झाला.

मारीमुथू हा या गायींसोबत माळरानावर आला होता. त्याला कानठळया बसवणारा मोठा आवाज ऐकू आला तो घटनास्थळी पोहोचला तेव्हा गायीच्या शरीराचे तुकडे झालेले होते.

एखाद्या प्राण्याची शिकार करण्यासाठी शिका-यांनी पानांमध्ये हा बॉम्ब ठेवला असावा अनावधानाने गायीने तो बॉम्ब चारा समजून तोंडात घेतला असे वन खात्याच्या अधिका-यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *