लिफ्टमध्ये अश्लिल चाळे; नवी मुंबईच्या हायप्रोफाईल सोसायटीतील धक्कादायक प्रकार

नवी मुंबईतील(Navi Mumbai) हायप्रोफाईल सोसायटीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रहिवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये एका इसमाने अश्लिल चाळे(Obscene Act) केले आहेत. तरुणाचे हे कृत्य लिफ्टमध्ये असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा प्रकार सुरु असताना लिफ्टमध्ये उपस्थित असलेली महिला भयभित झाल्याचे दिसत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

पनवेल मधील तळोजा येथील रहिवासी सोसायटीच्या लिफ्ट मध्ये हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. हा सर्व घटनाक्रम लिफ्टमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लिफ्ट मध्ये एक मध्यवयीन पुरुष आणि एक महिला दोघेजण असल्याचे दिसत आहे. या पुरुषाने लिफ्टमध्ये महिलेला एकटे बघून अश्लिल चाळे केले. आरोपी पुरुष अनेक वेळ या महिलेकडे पाहून अश्लिल कृत्य करत असल्याचे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या पुरुषाने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. एका मजल्यावर लिफ्ट थांबल्यानंतर हा पुरुष लिफ्टमधून बाहेर गेला. पुरुषाचे हे कृत्य पाहून अस्वस्था झालेल्या महिलेने थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी लिफ्ट मधील सीसीटीव्ही तपासून आरोपीला अटक केली. पोलिसांनी हे  कृत्य करणाऱ्या आरोपीला 354 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिस तपासात तक्रारदार महिला आणि आरोपी दोघेही एकाच सोसायटीमध्ये राहतात. या घटनेमुळे सोसाटीमध्ये राहणाऱ्या महिलांमध्ये भिती  निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 पार्किंगमध्ये चिमुरडीवर अत्याचार

दरम्यान, काही महिन्यांपूर्वींच नवी मुंबईतील एका सोसायटीच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये चिमुरडीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पार्किंगमध्ये खेळत असताना सोसायटीत सफाई काम करणाऱ्या व्यक्तीने या मुलीवर लैंगिक अत्याच केला होता. भयभित झालेल्या मुलीने आई वडिलांना याबाबत सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *