लंडनमध्येही ‘गोविंदा आला रे आला’, ‘कृष्ण जन्माष्टमी’साठी लाखोंची गर्दी

लंडनमध्येही ‘गोविंदा आला रे आला’, ‘कृष्ण जन्माष्टमी’साठी लाखोंची गर्दी

कृष्ण जन्माष्टमी जगभरात साजरी केली जाते. मात्र, लंडनमधील भारतीय आणि स्थानिकांमध्ये यंदा अनोखा उत्साह पाहायला मिळाला. लंडनच्या इस्कॉनमध्ये साजरी केलेल्या कृष्ण जन्माष्टमीसाठी लाखोंची गर्दी जमली होती.

इस्कॉनच्या भक्ती वेदंता मंदिरात दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाने कृष्ण जन्माष्टमी साजरी केली गेली. युरोपातील भगवान कृष्णाचं सर्वात मोठं मंदिर म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं.

विशेष बाब म्हणजे लंडनमध्ये साजरी केलेल्या या कृष्ण जन्माष्टमीला हिंदूंसह ब्रिटन, युरोप आणि जगभरातील विविध लोकांनी सहभाग घेतला होता. तब्बल 2 हजार स्वयंसेवकांच्या अथक प्रयत्नांनी हा सोहळा पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *