थरारक! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलटली, ४५ जण जखमी; तर एकाचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यात रविवारी भीषण अपघात झाला. या अपघातात भरघाव वेगाने येणारी बस अचानक उलटली. त्यामध्ये एकाचा मृत्यू तर ४५ जण जखमी झाले आहेत. यातील काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

सीसीटीव्ही व्हिडीओत दिसत आहे की, बस वेगात येत आहे. बसच्या पुढेच एक रुग्णवाहिका जात आहे. तर, काही लोक रोडवरून जाताना दिसत आहे. अशातच बस रोडच्या खाली उतरुन अचानक उलटती. बस उलटल्यानंतर बसच्या वरती बसलेले प्रवाशी खाली दबले जातात. हा अपघात झाल्यावर परिसरातील लोक तत्काळ मदतीसाठी येतात. तसेच, बसखालील दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत करतात.

बस चालकाला केली अटक

पूर्व बर्धमान जिल्ह्याची अतिरिक्त पोलीस आयुक्त ध्रुबो दास यांनी सांगितलं की, “या अपघातात ४५ जण जखमी झाले आहेत. चालकाला अटक करण्यात आली असून, बस ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस रोडवरती चालण्यासाठी पात्र होती का? याचा तपास पोलीस करत आहेत,” अशी माहिती दास यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *