पनवेलमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका अज्ञात माथेफिरूने रात्रीच्या सुमारास वाहनांना आग लावली. या घटनेमध्ये मोठं नुकसान झालं आहे. पार्कींमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना ही आग लावण्यात आली. या घटनेमध्ये वाहनं जळून खाक झाली आहेत. एक ट्रॅक्टर, तीन दुचाकी आणि एका रिक्षाला या माथेफिरूनं आग लावली आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यापूर्वी देखील अशा घटना घडल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
दरम्यान असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातवरण आहे. हा व्यक्ती मध्यरात्री फिरून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना आग लावतो आणि नंतर घटनास्थळावरून फरार होतो. या व्यक्तिविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र अजूनही जाळपोळ करणाऱ्या या व्यक्तीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. या व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला अटक करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
