मुंबईतील Mount Mary Church लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर; बॉम्बने उडवण्याची धमकी!

 एतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध माउंट मेरी चर्चला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. लष्कर-ए-तोयबा  या दहशतवादी संघटनेने ही धमकी दिली आहे. हा धमकीचा ईमेल आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. माउंट मेरी चर्च येथे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात जत्रा भरते. अशातच नाताळनंतर आता आलेल्या या धमकीनंतर पोलिस  अॅक्शन मोडवर आल्याचं पहायला मिळतंय.

माउंट मेरी चर्चला बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. लष्कर-ए-तोयबा या  दहशतवादी संघटनेने ही ईमेलद्वारे दिल्याने या प्रकरणात पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील माउंट मेरी चर्च हे भारतातील पाच सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे. हे चर्च येशू ख्रिस्त यांची माता मदर मेरी यांना समर्पित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *