सरकारी शाळामध्ये मिळणार परकीय भाषांचे धडे

जिल्हा परिषद, महापालिकेच्या शाळा, अनुदानित शाळा आणि सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश यांसारख्या परकीय भाषांचे शिक्षण मोफत घेता येणार आहे. पुण्यातील ‘एफएलओए’ या ऑनलाइन शिक्षण सामुग्री तयार करणाऱ्या संस्थेने परकीय भाषांचे ऑनलाइन मोड्युल तयार केले आहे. त्याद्वारे विद्यार्थी घरबसल्या किंवा शाळेतून परकीय भाषांचे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत.

एक ते चार अशा स्तरांमध्ये (चार मोड्युल) हा अभ्यासक्रम विभागला आहे. प्रत्येक स्तराचा अभ्यासक्रम सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केला जातो. मे २०२१ पासून हा प्रकल्प सुरू केला असून, या अंतर्गत आतापर्यंत देशातील २२० शिक्षण संस्थांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. देशभरातील वंचित घटकांमधील ४५०० हून अधिक मुलांनी जर्मन आणि फ्रेंच भाषांचे ऑनलाइन प्रशिक्षण घेऊन परीक्षा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *