सध्या बॉलिवूडमध्ये मोठमोठ्या कलाकारांच्या चित्रपटांचे बारा वाजलेले पाहायला मिळाले. हे वर्ष बॉलिवूडसाठी अत्यंत आव्हानात्मक होतं. अनेक हिंदी चित्रपट यावर्षी बॉक्स ऑफिसवर (box office) आपली जादू दाखवू शकले नाहीत. त्यातून हे वर्ष बॉलिवूडच्या वादांगांनीच अधिक भरले होते. लाल सिंग चड्ढाच्या बायाकोटपासून ते काश्मिर फाईल्स आणि रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट या सर्व प्रकरणांमुळे बॉलिवूडमध्ये जोरदार हंगामा झालेला पाहायला मिळाला.
परंतु सध्या बॉलिवूडमध्ये अनेक पाकिस्तानी कलाकार पुन्हा दिसू लागले असून पाकिस्तानी कलाकार हिंदी चित्रपटांतून परत दिसले तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील असा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेने उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी घेतला आहे.
नुकतेच अमेय खोपकर यांनी समाजमाध्यमांवरून निर्मात्यांना कडक इशारा दिला आहे. या स्टेटसमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, ”बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आला आहे, असं कानावर येतंय. ही नीच प्रवृत्ती वेळोवेळी ठेचावीच लागते, म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदूस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील.’, असा कडक इशारा अमेय खोपकरांनी दिला आहे.
अमेय खोपकरांनी आज फेसबुकवर एक (fb post) पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी याबाबतीत स्पष्टपणे इशारा दिला आहे. अमेय खोपकरांच्या या पोस्टला लोकांकडून चांगला प्रतिसाद येतो आहे. त्याचबरोबर अमेय खोपकरांनी अनेकांनी या मुद्द्यावरून पांठिबा दर्शवला आहे.
