संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिक्षेत्रात एका मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वनक्षेत्रामध्ये मामा-भाचा डोंगराच्या पायथ्याजवळ एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर पथकाने घटनास्थळी जाऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
ठाणे: येऊरच्या जंगलात मादी बिबट्याचा मृत्यू

