सिंघमचा व्हिलन प्रकाश राज यांच्याकडून गाव दत्तक

सिंघमचा व्हिलन प्रकाश राज यांच्याकडून गाव दत्तक

‘सिंघम’ चित्रपटात जयकांत शिर्के ही व्हिलनची भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेते प्रकाश राज प्रत्यक्ष जीवनात किती दिलदार आहेत याचं उदाहरण पहायला मिळत आहे. तेलंगणामधील महबूबनगरमधलं एक मागासलेलं गाव दत्तक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

पंचायत राज आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री के. तारकम्मा राव यांची भेट घेऊन प्रकाश राज यांनी गाव दत्तक घेण्याची इच्छा बोलून दाखवली होती. भेटीनंतर कोंडारेड्डीपल्ले हे तेलंगणाच्या दुर्गम भागातील गाव दत्तक घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं.

प्रकाश राज फाऊण्डेशन अंतर्गत गावाच्या विकासासाठी विविध योजना राबवण्याचा प्रकाश राज यांचा विचार आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरुन कोंडारेड्डीपल्ले गावात शेतीचा विकास करण्याचा त्यांचा मानस आहे.

शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा पुरवण्याचाही त्यांचा इरादा आहे. प्रकाश राज फाऊण्डेशनमधील स्वयंसेवक गावाचं सर्वेक्षण करत असून त्यानंतर ते विकासाची पद्धत ठरवणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *