साताऱ्यात राजवाडा परिसरात बुधवारी मध्यरात्री एकावर अज्ञाताकडून गोळीबार झाला. या गोळीबारात अप्पा मांढरे जखमी झाले आहेत. मांढरे यांच्या पोटात लागली गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साताऱ्यात राजवाडा परिसरातील गोलबागेजवळ तीन जणांनी अप्पा मांढरे यांच्यावर गोळीबार केला.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मारेकऱ्याचा शोध सुरू आहे. शहरात रात्री मध्यवस्तीत गोळीबार झाल्याचे वृत्त समजताच एकच खळबळ उडाली. गोळीबाराच्या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मांढरे यांच्यावर अज्ञाताने दोन गोळ्या झाडल्या, गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत.
