वंशाला दिवा हवा होता पण लेकीचा जन्म झाला; दोन दिवसांनंतर वडिलांनी स्वतःलाच संपवलं

पत्नीने चौथ्यांदा मुलीला जन्म दिल्यानंतर नैराश्यात गेलेल्या वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. वंशाला दिवा हवा म्हणून अनेकदा गर्भातच मुलींचा हत्या करतात. कर्नाटक राज्यातही असाच एक प्रकार घडला आहे. मुलाचा हव्यास असलेल्या व्यक्तीला चौथ्यांदापण मुलगी झाली या नैराश्यातून त्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. बेंगळुरातील श्रीनिवासपूर तालुक्यात ही घटना घडली आहे. मुलगा न झाल्यानं त्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

तीन वर्षानंतर पुन्हा त्याची पत्नी गर्भवती राहिली. यावेळेस तरी मुलगा व्हावा अशी त्याची इच्छा होता. मात्र, चौथ्यांदादेखील मुलगी झाली. शुक्रवारी त्याच्या पत्नीने मुलीला जन्म दिला आणि रविवारी लोकेशने गळफास घेत जीवन संपवले. लोकेशने उचललेल्या या निर्णयामुळं सगळ्यांनाचा मोठा धक्का बसला आहे.

लोकेशचे गावात चांगले संबंध होते. कोणासोबत काही वादही नव्हते, त्याची आर्थिक परिस्थितीदेखील उत्तम होती. फक्त मुलाच्या हव्यासापोटी त्याने टोकाचे पाऊल उचलले, असं गावातील एका व्यक्तीने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *