दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने सोडलेल्या जादा गाडय़ा, दहा टक्के भाडेवाढ आणि प्रवाशांनीही प्रवासासाठी निवडलेला एसटीचा पर्याय यांमुळे महामंडळाच्या तिजोरीत एकूण २१८ कोटी रुपये उत्पन्नाची भर पडली आहे. सर्वाधिक उत्पन्न हे धुळे विभागातून मिळाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
दिवाळीला २२ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. त्यापूर्वीपासून एसटी महामंडळाने राज्यात नियमित गाडय़ांबरोबरच दररोज १,५०० जादा गाडय़ाही सोडल्या. या गाडय़ांचे मोठय़ा प्रमाणात आरक्षणही झाले. याच दरम्यान २१ ते ३१ ऑक्टोबपर्यंत १० टक्के भाडे आकारणी केली.
