डॉली बिंद्रानंतर आता मॉडेल अर्शी खानने केला राधे माँवर गंभीर आरोप

डॉली बिंद्रानंतर आता मॉडेल  अर्शी खानने  केला  राधे माँवर गंभीर आरोप

स्वंयघोषित धर्मगुरु राधे माँच्या अडचणी काही थांबवण्याचं नाव घेत नाहीत. डॉली बिंद्रानंतर आता मॉडेल आणि अभिनेत्री अर्शी खानने राधे माँवर गंभीर आरोप केले आहेत. राधे माँने मला सेक्स रॅकेटमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अर्शी खानने केला आहे.

राधे माँची सहा-सात महिन्यांपूर्वी भेट झाली होती. त्यावेळी तिच्या बिझनेस पार्टनरसोबत मिटिंग झाली. तुला पैसा आणि प्रसिद्ध हवी असल्यास आमच्या सेक्स रॅकेटच्या धंद्यात सहभागी व्हावं लागेल, असा आरोप अर्शी खानने केला आहे. शिवाय राधे माँ इतर मुलींनाही सेक्स रॅकेटमध्ये पाठवत असा दावाही अर्शीने केला आहे.

अर्शी खान ही भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने अनेक दाक्षिणात्य सिनेमात काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी ती हैदराबादमध्ये एका तेलुगू सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसोबत अर्शी खानचं अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे. दुबईतील एका हॉटेलमध्ये दोघांना एकत्र पाहिल्याचं वृत्तही प्रसिद्ध झालं होतं.

रिअलिटी शो बिग बॉसच्या 9 मध्ये दिसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसमध्ये सामील होणाऱ्या स्पर्धकांची संभाव्य नावं जाहीर झाली होती, त्यात अभिनेत्री अर्शी खानचंही नाव होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *