एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांचाच बँकेला गंडा

एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांचाच बँकेला गंडा

एटीएममध्ये पैसे भरण्याचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच बँकेला 81 लाखांचा गंडा घातल्याची घटना सिंधुदुर्गमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी कुणाल सावंत आणि प्रदीप तांबेट या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँक ऑफ इंडियाच्या कणकवली शाखेमध्ये पैसे भरण्याची जबाबदारी कंपनीने आरोपी प्रदीप आणि कुणालवर सोपवली होती. मात्र एटीएममध्ये पैसे भरताना आरोपींची जोडगोळी ठरावीक रक्कम स्वतःच्या खिशात टाकत असे. अशा प्रकारे आरोपींनी तब्बल 81 लाखांवर डल्ला मारल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे.

पोलिसांनी प्रदीप तांबेटला अटक केली असून कुणाल सावंत फरार झाला आहे. दोन्ही आरोपी सीएमस इन्फोसिस्टम कंपनीमध्ये काम करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *