सांगली : जत तालुक्यात तलावात पडून आईसह तीन मुलींचा दुर्देवी मृत्यू

जत तालुक्यातील बिळुर येथे तलावात पडून आई आणि तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घराशेजारी असलेल्या तलावावर धुण्याचे कपडे आणि साबण असे साहित्य आढळून आले आहे. रात्री उशिरा तलावातून चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहेत. मृत्यू झालेल्यांची नावे सुनीता माळी (वय ३०), अमृता माळी (वय १३), अश्विनी माळी (वय १०), ऐश्वर्या माळी (वय ७) अशी आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *