दिल्लीतील युवतीवर 11 जणांकडून बलात्कार

शहरातील एका युवतीवर जयपूरमध्ये 11 जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दांपत्य नोकरीसाठी युवतीला सोबत घेऊन जयपूरला घेऊन गेले होते. जयपूरमध्ये त्यांनी एका हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते. हॉटेलमध्ये युवतीवर तब्बल 11 जणांनी बलात्कार केला. बलात्कार करणाऱयांमध्ये हॉटेलमधील कर्मचाऱयांचाही समावेश आहे.

बलात्कारानंतर पीडित युवतीची हॉटेलमधून सुटका करण्यात आली. या घटनेनंतर पीडित युवतीने दिल्ली गाठली. शहरातील मंगोलपुरी चौकीमध्ये जाऊन सामुहिक बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *