प्रवासी कार मध्ये 6 एअर बॅगचे सक्ती करण्यात येण्यासाठी एका वर्षाने लांबणीवर टाकलीआहे. 1ऑक्टोबर 2023 पासून नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल असे केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले. गडकरी यांनी याबद्दल घोषणा केली. वाहन उत्पादकांना जागतिक पुरवठा साखळी बाबत भेडसावणाऱ्या समस्या त्यांच्या अर्थकारणावर होणारा परिणाम विचारात घेऊन प्रवासी कार मध्ये (एम श्रेणी-1)सहा एअर बॅग अंमलबजावणी 1ऑक्टोबर 2023 पासून होईल. सर्व प्रवाशांची सुरक्षा ही गाडीची किंमत आणि अन्य बाबीं पेक्षा अधिक महत्त्वाची आहे असे ते म्हणाले. सहा एअर बॅग दिल्यामुळे गाडीची किंमत वाढेल, असा दावा वाहन उत्पादकाने केला आहे. मात्र या सक्तीवर गडकरी ठाम आहेत.