तांदळाने गाठला विक्रमी दर; महिनाभरात प्रति क्विंटल आठशे-नऊशे रुपयांची वाढ

गेल्या काही महिन्यांपासून धान्य बाजारात महागाईचे वारे सुरू आहेत. डाळींचे दर वाढल्याने सामान्यांची चिंता वाढली होती. विशेषत: तूरडाळ महागल्याने ताटातील वरण गायब होणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती. या दरवाढीला महिना-दीड महिना लोटत नाही तोच तांदळाचे दर वाढले आहेत. याबाबत अधिक सांगताना धान्याचे ठोक विक्रेता प्रताप मोटवानी म्हणाले, ‘पूर्वी ‘दाल-चावल खाओ, प्रभू के गुण गाओ’, असे म्हटले जायचे. मात्र, आता डाळ आणि तांदूळ दोन्हीचे दर वाढल्याने प्रभूचे नाव घ्यावे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गहूदेखील महाग

यंदा गव्हाचे दरदेखील चढे दिसून आले आहेत. एमपी बोटचा दर प्रतिक्विंटल ४५०० ते ५५०० रुपये, लोकवन २८०० ते ३५०० रुपये, टुकडी २८०० ते ३६०० रुपये आहे. गव्हाचा हा दर आजवरचा विक्रमी दर सांगण्यात येत आहे. गव्हाप्रमाणेच तूरडाळीचा दर प्रतिक्विंटल १०,००० ते ११,५०० रुपये, उडद ९५०० ते १२,००० रुपये, मूग ९,००० ते ११,००० रुपये, काबुली चना १०,००० ते १२,००० रुपये आहे.

असा झाला बदल

तांदूळ : जुने दर : नवीन दर

चिन्नोर : ५००० ते ५५०० : ६००० ते ६५००

 जय श्रीराम : ४४०० ते ४८०० : ५००० ते ५६००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *