राज्यात कोरोना, स्वाईन फ्लू मागोमाग आणखी एक संकट, घेतले ‘इतके’ बळी

राज्यात कोरोना आणि स्वाईन फ्लू नंतर आणखी एक संकट डोकवर काढत आहे. राज्यात लम्पी विषाणूजन्य आजाराचा विळखा वाढला आहे. राज्यात लम्पी  विषाणूमुळे 11 गायींचा मृत्यू झाला आहे. 9 राज्यात आतापर्यंत सुमारे 50 हजार गायींचा बळी गेला आहे. जळगाव, अकोला, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात लम्पींचा कहर वाढला आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे. दुभत्या जनावरांमध्येही हा विषाणू वेगाने पसरत असल्याबद्दल लोकांमध्ये चिंता वाढत आहे.

लम्पी विषाणू मानवांमध्ये देखील पसरू शकतो का याबाबत लोकांमध्ये चिंता आहे. कारण दूध हे राजस्थानात सर्वात जास्त वापरले जाणारे पेय आहे. लोकसभेतही हे प्रकरण गाजले. राजस्थानकडून मदतीचा प्रस्ताव आला नसल्याचे केंद्राने म्हटले आहे.

मानवांमध्ये पसरत नाही : डॉ राजोरिया
पॉलीक्लिनिकचे संचालक डॉ. जितेंद्र राजोरिया आणि एसएमएस हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर डॉ. रमण शर्मा यांनी सांगितले की, लम्पी हा विषाणूजन्य आजार आहे, जो डास आणि कीटक चावल्यामुळे, संक्रमित जनावरांच्या संपर्कामुळे होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *