कारची धडक लागून बाईक थेट कोसळली नदीत, दोघांचा शोध सुरु

नागपूर जिल्ह्यातील मौदा या ठिकाणी स्विफ्ट कारने कन्हान नदीवरील पुलावर बाईकला धडक दिली. त्यामुळे बाईक वरील दोघे जण नदीत फेकले गेले. प्रशासनाकडून दोघांचा शोध सुरु आहे. आज संध्याकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.

स्विफ्ट कार मधील तिघे ही जण जखमी झाले आहेत. तर नदीत फेकल्या गेलेल्या व्यक्तींमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *