शिवसेनेचा आणखी एक आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात

राज्याच्या राजकीय वर्तुळातून  मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचा  आणखी एक आमदार एकनाथ शिंदे गटाच्या  संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. हा आमदार शिंदे गटात लवकरच प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेचा तो आमदार कोण, अशी चर्चा रंगू लागली आहे.

शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदेसोबत जात भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं. महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार व्हाव लागलं.

शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असलेला आमदार हा कोकणातील असल्याचं म्हटलं जात आहे. या आमदारांने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची  भेट घेतल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. तसेच या आमदाराच्या  दीपक केसरकर यांच्या कार्यालयात फेऱ्या वाढल्याचे खासगीत बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *