सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; तुमच्या खात्यात पैसे जमा, लगेच चेक करा

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता एक बातमी चांगली बातमी. कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे पैसे जमा झाले आहेत. गणपती सणाआधीच खात्यात पैसे जमा झाल्याने कर्चमाऱ्यांसाठी आनंद द्विगुणीत झाला आहे. महाराष्ट्र सरकारने ही गुडन्यूज दिली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आले आहेत. यापूर्वी कर्मचाऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये वेतन दिले जात आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या भत्त्यात चार टक्के वाढ केली आहे. दुसरीकडे, अनेक राज्यांनी डीए (महागाई भत्ता) वाढवला आहे. अनेक राज्यांतील कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्के आहे. आता महाराष्ट्र सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि चांगली बातमी दिली आहे. याआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते आले आहेत. आता सरकार तिसरा हप्ता खात्यावर पाठवत आहे.

जुलै ते ऑगस्ट महिन्यात थकबाकीचा तिसरा हप्ता

महाराष्ट्र सरकारने सातव्या वेतन आयोगाअंतर्गत ( 7th Pay Commission) थकबाकीचा तिसरा हप्ता देण्याची घोषणा आधीच केली होती. महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष होण्यापूर्वीच त्याची कागदपत्रे पूर्ण झाली. आता जुलै ते ऑगस्ट महिन्यात थकबाकीचा तिसरा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात येत आहे. सरकारने तिसरा हप्ता जारी केला आहे. याचे पैसे जमा होऊ लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *