गोळीबाराने धुळे शहर हदरले, तरुणाची गोळ्या घालून हत्या

धुळे शहर गोळीबाराने हदरले आहे. शहरातील कुमारनगर भागात एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. चिन्नु उर्फ चंदन पोपली असे गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. चिन्नूचे भटू चौधरी आणि यासिन पठाण यांच्याशी पैशावरुन वाद होते. रात्री उशिरा चिन्नूचा संशयित आरोपींशी वाद झाला. त्यानंतर आरोपींना चिन्नूवर गोळीबार केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

चिन्नु तथा चंदन राजेंद्र पोपली याचे आर्थिक कारणावरून चिन्नुचे भटू चौधरी आणि यासीन पठाण या दोघांशी वाद सुरु होता. याच वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रात्री संशयीत चिन्नुचा शोध घेत होते, ज्या ठिकाणी तो बसलेला होता तिथे आले, त्यानी वाद घातला. त्याच झटापटीत संशयीतांनी गोळीबार केला.

ही गोळी छातीत घुसली. हृदयाच्या जवळ गोळी लागल्याने चिन्नुचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघा संशयतांना ताब्यात घेतलेले आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे मात्र संपूर्ण धुळे शहर हादरुन गेले आहे. पोलीस या घटनेबाबत काही बोलण्यास नकार दिला आहे. तपास सुरु आहे. मात्र, आम्ही माहिती घेतल्यानंतर बोलू, असे सांगणून यावर भाष्य करण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे पोलीस प्रशासन एवढी गंभीर हत्येची घटना घडली असतानाही, माहिती देण्यास पोलीस टाळाटाळ का करत आहेत, असा सवाल नागरिक आणि त्याच्या नातेवाईयिकांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *