इन्स्टाग्रामवर असाल तर सावध व्हा! १९ वर्षाच्या नराधमाकडून पॉर्नचं जाळं

मुंबई पोलिसांनी अवघ्याा १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या तरुणाने असं काही केलं आहे, जे वाचून तुमच्या पायाखालची जमिन सरकेल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपी तरुणाने आतापर्यंत २२ महिलांना आपलं शिकार केलं आहे. त्याने शहरातील तब्बल २४ हून अधिक महिलांच्या सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर केला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर १९ वर्षीय प्रशांत आदित्यला त्याच्या गुजरातमधील गांधीनगर येथील घरातून अटक करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहावीत नापास झाल्यानंतर आरोपी मास्क बनवणाऱ्या कंपनीत काम करू लागला. विशेष म्हणजे आदित्य त्याच्या समाजातील महिलांनाच टार्गेट करत होता. त्याने, १४ जुलैला आरोपीने समाजातील किमान २२ महिला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या प्रकरणाबाबत अँटॉप हिल पोलिसांशी संपर्क साधला आणि सर्व त्रास सांगितला. आरोपीच्या या कृत्यामुळे म्हणजेच अश्लील क्लिप पाठवल्या जात असल्याने मानसिक छळ, भीती आणि छळ होत असल्याचे पीडितांनी पोलिसांना सांगितले. पाठवलेल्या क्लिप बहुतेक ३० सेकंदांच्या होत्या असंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *