अभिनेता सलमान खानने अनेकांना बॉलिवूडमध्ये संधी दिली. अनेक उभरत्या कलाकरांना बॉलिवूडमध्ये मार्ग मोकळा करुन दिला, पण अनेकांना भाईजानने उत्तम सल्ला देखील दिला. महत्त्वाचं म्हणजे नव्या कलाकारांनी देखील सलमानने दिलेल्या सल्ल्यावर विश्वास ठेवत, तो सांगेल तिचं पूर्व दिशा मानली आणि यशाच्या उच्च शिखरावर विराजमान झाले. अभिनेत्री किआरा आडवाणीने देखील सलमानने दिलेला एक सल्ला मान्य केला आणि स्वतःचं नाव बदललं.
‘शेरशाह’ फेम किआरा आडवाणीचं खरं नाव किआरा नसून आलिया आडवाणी आहे. पण इंडस्ट्रीमध्ये एक आलिया यशाच्या शिखरावर असताना दुसरी आलिया नको असा सल्ला सलमानने किआरा दिला, असल्याच्या चर्चा रंगत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल ज्यामाध्यामातून सत्य समोर आलं आहे. किआरा आडवाणीचं खरं नाव आलिया आडवाणी असं आहे. अभिनेत्रीला नाव बदलण्याचा सल्ला सलमान खानने दिला होता. कारण एकाचं ठिकाणी दोन आलिया नसू शकतात.. असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभनेत्री किआरा आडवाणी आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. आज त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. दोन्ही अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.
