कॉलेज आयडी दाखवा आणि दारू प्या… पुण्यात कॉलेजबाहेरच लागले फ्लेक्स

पुण्यात सध्या काय सुरु आहे असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे आणि याला कारणही तसंच आहे. पुण्यातील लोणी काळभोर इथल्या एम आय टी कॉलेज बाहेर विद्यार्थ्याना चक्क दारू पिण्यासाठी आमंत्रित करणारे फ्लेक्स लावण्यात आले होते. हा फ्लेक्स व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

द टीपसी टेल्स या हॉटेलचे हा फ्लेक्स होता. लोणी इथल्या कॉलेजच्या बाहेरच हा फ्लेक्स होता. यात विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर देण्यात आली होती. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आयडी कार्ड दाखवा आणि विशेष सवलतीत कितीही ड्रिंक्स घ्या अशी सार्वजनिक जाहीरात देण्यात आली होती.

विद्यार्थ्यांना दारू पिण्यासाठी खास सवलत देणाऱ्या या हॉटेलवर पोलिस आणि उत्पादन शुल्ककडून कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांची होती. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी देवीप्रसाद शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, हे पोस्टर वायरल झाल्यानंतर काही वेळात ते काढून टाकण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *