“दखलपात्र गुन्हा घडल्याचे लक्षात येताच गुन्हा नोंदवणे पोलिसांचे कर्तव्य”

दखलपात्र गुन्हा घडल्याचे लक्षात येताच प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने गुरुवारी केली. तसेच बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्याबाबत मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांच्या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने निकाली काढली.

न्यायालयाने स्पष्टीकरण मागितल्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस उपायुक्तांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचा वादग्रस्त आदेश मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतला होता. त्यानंतर त्यांनी सुधारित आदेश काढला होता. त्यालाही उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *