पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान जखमी

जम्मू काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे.
 
लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) सकाळी आठच्या सुमारास पुँछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी परिसरातील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. पाक सैन्याने हमीरपूर सेक्टरमध्येही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकच्या गोळीबारात एक जवान जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही प्रत्युत्तर दिले.
 
पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी आर. एस. पुरा सेक्टरमधील चौक्यांवर मॉर्टर शेलिंग केले होते. त्यापूर्वीही पाक सैन्याकडून सतत गोळीबार करण्यात येत होता. ऑगस्टमध्ये पाक सैन्याने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामध्ये दोन जवानांसह अकरा जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *