वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचे १७ दरवाजे उघडले

वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचे १७ दरवाजे उघडले

वर्धा जिल्ह्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे १७ दरवाजे आज (शुक्रवार) सकाळी ६ वाजता ९० सेंमीने उघडण्यात आले. प्रकल्पातून १२५३.१६ घन.मी/से.पाणी विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.

नदी पात्राच्या दोनही काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे हिंगणघाट ते कुटकी व हिंगणघाट ते दाभा रोड बंद झाले आहेत. कार नदी प्रकल्पही आज सकाळी ६.३० वाजता शंभर टक्के भरले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *