‘शिवतिर्थ’मध्ये लपलेला बिबट्या अखेर जेरबंद

नाशिकच्या सातपूर परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलं आहे. बिबट्या वस्तीत शिरल्याने दहशत निर्माण झालीय. आठवड्यापूर्वी औद्योगिक वसाहत परिसरात बिबट्या आढळला होता.

आता हा बिबट्या पुन्हा दिसल्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत. नागरिक वस्तीत बिबट्याचं दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होते.

नाशिकच्या सातपूर परिसरात दिसलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आलं. बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच रेस्क्यू टीम दाखल झाली. या बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात यश आलं आहे.

हा सगळा थरार दोन तास सुरू होता. बिबट्याला पकडल्याने या वस्तीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *