उद्धव ठाकरेंच्या ‘हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही’ प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी याबद्दल…”

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात भाजपाने मुख्यमंत्रीपदाची माळ घातल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही असं म्हटलं. त्यानंतर काही तासांमध्येच एकनाथ शिंदेंची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवायांमुळे हकालपट्टी करत असल्याचं या पत्रात म्हटलंय. असं असतानाच एकनाथ शिंदेंनी हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही या उद्धव ठाकरेंच्या टीकेवरुन प्रश्न विचारला असताना सध्या थेट प्रतिक्रिया दिली नसली तर या प्रश्नाला मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलंय.

उद्धव नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यांनी तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले आहे, असे स्पष्ट करीत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याने पुढील अडीच वर्षे तरी राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *